कथुआ घटना…काय आहे वास्तव? 

“कथुआ घटना क्षुल्लक’ हे काश्‍मीर मंत्रीमंडळातील नवीन उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांचे विधान उथळ आहे! कथुआ प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे जाऊ नये, या मागणीसाठी उभे हाडवैर असणारे उमर अब्दुल्ला व मुफ्ती महंमद एकत्र आले आहेत. मागे सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी दोन काश्‍मीरी महिलांवर अत्याचार करून पाण्यात ढकलून मारले, यासाठी काहूर माजवले गेले. एका महिला डॉक्‍टरने खोटे पुरावे उभे केले. पुढे काही महिन्यांनी हे प्रकरण खोटे होते व धुणे धुण्यासाठी गेलेल्या त्या महिला पाय घसरून वाहून गेल्याचे सिद्ध झाले. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे पद्धतशीर कारस्थान केले जाते व कॉंग्रेस, वामपंथी यामागे असतात!

अत्याचारग्रस्त मुलीचे नाव व फोटो मिडियात येऊ नये, असे दंडक असताना व हे प्रकरण चार महिने जुने असताना नाव, फोटो मिडियात आले. युएनपर्यंत निषेध झाले, मेणबत्ती मोर्चे काढले गेले! अशाच काही घटना इतरत्रही झाल्या. त्याचे कोठे नामोनिशाणही आले नाही. हेही प्रकरण संशयास्पद आहे की काय, असे वाहिनीवरील वृत्तावरून दिसते. एका खोलीचे चारी बाजूला खिडक्‍या असलेले मंदिर तेथे शेजारच्या गावातील भाविक दर्शनासाठी येतात व आठ वर्षांच्या बांधून ठेवलेल्या मुलीची कोणालाही खबर लागू नये? या प्रकरणातील संशयात आरोपी मुझफरनगरमध्ये त्याच सुमारास एटीएम मधून पैसे काढताना दिसल्याचे चित्रण झाले आहे. फक्‍त सत्तास्वार्थासाठी कॉंग्रेस-वामपंथी कोणत्याही थराला जाऊ शकतात! बॅंक घोटाळ्यावरून आता ओरडा चालू आहे! मागे इंदिराजींचे काळात रिझर्व बॅंकप्रमुख नगरवाला यांचा अशाच प्रकरणात कारावासात संशयास्पद मृत्यू झाला होता!!
– श्‍यामसुंदर गंधे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)