कथुआ, उन्नाव घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात कॅंडल मार्च

संग्रहित छायाचित्र

अकोले – मानवतेला काळिमा फासणाऱ्या व क्रौयाची परिसीमा गाठणाऱ्या उन्नाव व कथुआ येथील घटनेचा आज सायंकाळी अकोलेत कॅंडल मार्च काढून निषेध करण्यात आला.

मराठी शाळा, बाजारपेठ, थिएटर, गुजरी बाजार, कोल्हार घाटीमार्गे बसस्थानकात हा कॅंडल मार्च काढण्यात आला होता. तेव्हा वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या मार्चमध्ये मुस्लीम युवकांचा मोठा सहभाग होता. या मार्चमध्ये इतर सर्व पक्षीय, पंथीय व जाती धर्माचे सर्व आंदोलक सहभागी झाले होते.
बसस्थानक परिसरात शेवटी डॉ. अजित नवले, डॉ. संदीप कडलग, आरिफ तांबोळी, दीपक महाराज देशमुख, भाऊसाहेब चासकर, विजया पाडेकर, अश्‍विनी काळे, ऍड. मंगला हांडे, मनकर यांची भाषणे झाली.

या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून वरील वक्‍त्यांनी यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. रवींद्र रुपवते, नारायण एखंडे, दिलीप शेणकर, सोमनाथ नवले, नितीन गोडसे, स्वाती शेटे, अरुण रुपवते, लक्ष्मण आव्हाड, ललित छल्लारे, विलास गव्हाणे, भाऊसाहेब कासार, प्रा. बबनराव पवार, विकास वाकचौरे, निखिल जगताप, ज्ञानेश शास्त्री व अन्य पदाधिकारी यात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)