कथुआतील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात मोर्चा

शिवसेना महिला आघाडी संपर्क नेत्या रंजना नेवाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
अकोले – जम्मू-काश्‍मीर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. अकोल्यात देखील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संपर्क नेत्या रंजना नेवाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
देशात आणि राज्यात गेल्या तीन वर्षांत महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. दररोज मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना घडत असताना आरोपींवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. जम्मू-काश्‍मीरमध्येही काही दिवसांपूर्वी एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपींवर कडक कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क नेत्या रंजना नेवाळकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.
या वेळी नायब तहसीलदार बी. जी. भांगरे यांनी निवेदन स्वीकारले. शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ, शिवसेनेचे युवा नेते सतीश भांगरे, उपसभापती मारुती मेंगाळ, जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे, पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे, संदीप दराडे, बाळासाहेब मालुंजकर, रजनीकांत भांगरे, दीपक कासार, बाळू फोडसे, रामदास गावंडे आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)