जम्मू – जम्मू काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यात बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या एका अनाथाश्रमावर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने छापा घालून 19 मुलांची सुटका केली आहे. छळ आणि मारहाण केली जात असल्याची तक्रार काही मुलांनी केल्यावर शुक्रवारी हा छापा घालण्यात आला.

केरळमधील एका पास्टरकरवी हा अनाथाश्रम चालवण्यात येत होता. याप्रकरणी ऍन्टोनी थॉमस या पास्टरला अटक करण्यात आली आहे आणि “पोस्को’ कायद्याच्या तरतूदींखाली त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र ऍन्टोनीने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

या अनाथाश्रमामध्ये 21 मुले रहात होती. त्यापैकी दोघेजण पठाणकोट येथे एका विवाहसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. त्या मुलांनी पत्रकारांना या अनाथाश्रमातील स्थितीबाबत सांगितले होते. या आश्रमातील 5 ते 16 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना सरकारी बाल आश्रम आणि नारी निकेतन येथे हलवण्यात आले आहे. ही मुले पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू येथील रहिवासी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)