कथा सातारच्या उद्यानांची (भाग -1) : उद्याने मानसिक तणावमुक्तीची केंद्रे व्हावीत

गुरूनाथ जाधव

सातारा – सातारा शहरामधील उद्याने मानसिक तणाव मुक्तीची केंद्र व्हावीत अशी सर्वसामान्य सातारकरांची अपेक्षा आहे. याची पुर्तता करणं नगरपरिषदेला जमणार का हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सातारा शहरामध्ये नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या श्री छत्रपती शाहु उद्यान (गुरूवार बाग), श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान, राजवाडा,पुण्यशील सुमित्राराजे भोसले उद्यान सदर बझार, शाहूपूरी हुतात्मा उद्यान, आयुर्वेदीक गार्डन अशी उद्याने आहेत या उद्यानांची अवस्था व सद्यस्थिती याचा विचार करावा लागणार आहे.

बालचमुंची अख्खी सुट्टी गेली. मात्र दुरूस्तीच्या कारणात्सव उद्यानं खेळण्यासाठी उपलब्ध झाली नाहीत.मोडकळीस आलेल्या खेळण्यांना दुरूस्त करणे गरजेचं बनले आहे. शहरामध्ये लहान मुलांना मनसोक्त खेळता यावी अशी मैदाने आज उरली नाहीत. काही वर्षांनपूर्वी सातारा शहरामध्ये उद्याने ही उर्जा केंद्रे होती. उद्यांनामध्ये घसरगुंडी असेल सि- सॉ असेल,मनसोक्त खेळण्याचा आनंद लहान मुलांना घेता येत होता.

बागेत बसून भेळ खायची, रेल्वेतून फेर-फटका अशा सगळया आठवणी आज अनेकांच्या स्मरणात असतील. पण सध्या अबाल वृध्दांसाठी बागांमध्ये फिरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बनविण्यात आलेले सिंथेटिक ट्रॅंक मध्ये गवत उगवले, तर काही ठिकाणी ट्रॅकच बिघडला आहे. काही उद्यानामध्ये अवास्तव वृक्षारोपण करून गर्दी केल्याचे दिसते. तर दुसरीकडे पाणी नसल्याने झाडे जळून गेल्याचे चित्र दिसत आहे. कुठे विद्यूत दिवे नादुरुस्त तर कुठे त्याच्या बॅटरीच चोरीला गेल्या. बसण्याची बाकडे मोडली, तर कुठे तळीरामांनी बसून बाटल्यांचा खच साचलाय.उद्यानाचे व्यवस्थापन ठेकेदाराच्या हातामध्ये गेले आणि उद्यांनामध्ये मार्केटींग सुरू झाले आणि उद्यानांचे अव्यवस्थापन उद्यांनाच्या दुरावस्थेला कारण ठरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्यांनाची चवच गेली असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.

सातारा शहरातील गुरूवार बाग ज्यामध्ये काही वर्षापूर्वी भव्य असे कारंजे बसविले होते जे संगीताच्या तालावरती नाचायचे ते पहायला मोठी गर्दी व्हायची पण ते बंद झाले आणि बागेतील गर्दी नाहीशी झाली. आता या बागेत जॉगिंग व योगा आणि ओपन जिम संकल्पना नव्याने उदयास आणल्या. किमान यासाठी तरी नागरिक येथे येतात हे विशेष आहे. इतर बागांमध्ये देखील लहान मुलांना खेळायला तसेच त्यांच्या सोबत पालक वर्गाला यायचा उत्साह कमी होवू लागला. याची कारणं शोधणं महत्वाचं आहे. उद्याने ही नागरिकांच्या मनोरंजनाकरिता व शहराच्या सौंदर्याकरिता विकसित करणे आवश्‍यक असताना याच गोष्टी कडे दुर्लक्ष करून बागा किंवा उद्याने कश्‍यासाठी आहेत याचाच विसर पडल्याचे दिसत आहे.

विविध संकल्पनेवर आधारित काही नव्याने उद्यानांची निर्मिती केल्याचे पहावयास मिळत आहे ज्यामध्ये आयुर्वेद गार्डन संकल्पना स्तुत्य आहे. या उद्यांनामध्ये शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक युवकांचा देखील मुक्त वावर होईल तसेच यातुन पर्यंटनाच्या संधी देखील उपलब्ध होतील. मात्र या करिता उद्यानांची दैनंदिन देखभाल करणे, उद्यानांचे चोख व्यवस्थापन करणे, उद्यानामधील बागकामविषयक घटकांची देखरेख करणे, रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती करणे या महत्वाची गोष्टींवरती नगरपरिषदेनं लक्ष न दिल्याने आज त्यांची अवस्था झाल्याचे दिसत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास उद्याने ही मानसिक तणाव मुक्तीची व उर्जा देणारी केंद्रे बनतील.

कायमस्वरुपी कर्मचाऱ्याची निकड…
पिण्याच्या पाण्याची सोय, पुरूष व महिला स्वच्छता गृहे, कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, प्रथमोचार सुविधा, उद्यांनामध्ये दैंनंदिन साफ-सफाई तसेच स्वच्छता, उद्यानांची देखभाल, दुरूस्ती, व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास उद्यानांचे व्यवस्थापन राहिल व उद्याने सुस्थितीत राखली जातील यासाठी या गोष्टी प्रत्येक उद्यानात असणे आवश्‍यकच आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)