#कथाबोध: हास्यदेवाची साधना 

डॉ. न. म. जोशी 
महात्मा गांधी देशभक्‍त होते. सामाजिक कार्यकर्ते होते, लेखक होते, वैचारिक होते. लुई फिशर नावाचे इंग्लिश पत्रकार त्यांच्या चांगलाच परिचयाचा होता. फिशर आणि गांधीजींमध्ये अनेकदा संवाद होत असे.
या संवादात अनेक गंभीर बाबींवर चर्चा होत असे. सत्याग्रह, खादी, निसर्गोपचार यावरही फिशर चर्चा करत. असाच एक संवाद सुरू होता. विचारांची देवघेव सुरू होती. गंभीर चर्चा सुरू असताना जी चर्चेने एक वळण घेतलं. गांधी काहीतरी बोलले. फिशर यांनी त्यावर शेरेबाजी केली. त्यावर गांधीजी मोठ्याने हसले.
गांधीजींना मोठ्याने हसताना बघून फिशर यांचा चेहरा बघण्यासारखा झाला. आश्रमातले अन्य लोकही हे दृष्य बघत होते.
गांधीजी हसत आहेत आणि फिशर आश्‍चर्यचकित झाले आहेत. एक मिनिटभर तरी त्या बैठकीत हे विलक्षण वातावरण तसेच राहिले. थोड्या वेळाने गांधीजींचे लक्ष फिशर यांच्याकडे गेलं.
गांधीजींनी विचारले “काय झालं? आपण असे का बघत आहात?
“बघतोय! विलक्षण दृष्य! महात्मा गांधी मोकळेपणाने हसत आहेत हे दृष्य! फिशर म्हणाले
“का बरं! मला हसणं वर्ज्य आहे का?’ गांधीजींनी विचारलं.
“आतापर्यंत मी आपणाला केवळ गंभीर प्रकृतीचे देशभक्‍त समजत होतो.’
“हो, पण मी राष्ट्रदेवाबरोबरच हास्यदेवाचीही आराधना करतो.’ गांधीजी पुन्हा हसू लागले.
गांधीजींच्या या उत्तराने फिशर आणखी आश्‍चर्यचकित झाले. त्यांचा गांधीजींविषयी त्यांची आदर वाढला.
कथाबोध 
हास्य हे मानवाला निसर्गाने दिलेले वरदान आहे. हास्य हे प्रसन्नतेचे प्रतिक आहे जीवनात हास्याचे फुलोरे नसतील तर जीवन रूक्ष होईल. गंभीर विचारांची माणसेही विचार गंभीरपणे करीत असली तरी मोकळेपणाने संवाद करून हसतात. हसण्याने अनेक ताण कमी होतात आणि जीवनाची वाटचाल सुखावह होते, हे ध्यानात घ्यायला हवे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)