#कथाबोध : सर्वसाक्षी

डॉ. न. म. जोशी

एका गुरुकुलात काही शिष्य ज्ञानसाधना करीत होते. त्यापैकी तीन शिष्याचचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे दीक्षा देण्याचा कार्यक्रम होता. या तीन शिष्यांचे एक राजकुमार होता. दुसरा श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि तिसरा गरीब शिक्षकाचा मुलगा होता. गुरुवर्यांनी सर्वांनाच सारखे शिक्षण दिले होते. भौतिक विद्यांसह त्यांना अध्यात्माचेही धडे गुरुवर्यांनी दिले होते.

-Ads-

“गुरुवर्य, तुम्ही आमची अंतिम परीक्षा केव्हा, कशी घेणार?’ एकाचा प्रश्‍न.
“घेणार. तिघांनाही मी एकच समस्या देणार आहे,’ गुरुवर्य म्हणाले.
काही दिवसांनंतर प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस आला. तिघांनाही वाटलं गुरुवर्य आपल्याला प्रश्‍न विचारतील, पाठांतर केलेले श्‍लोक म्हणायला सांगतील. भूर्जपत्रांवर काही लिहायला सांगतील.
पण गुरुजींनी यातलं काहीच केलं नाही. तिघांना समोर बसवलं आणि एका मोठ्या पसरट पात्रात काहीतरी झाकून ठेवलं होतं. त्याकडे गुरुजींनी निर्देश केला. गुरुजींनी एकाला त्यावरील आवरण दूर करण्यास सांगितलं. काय होतं त्याखाली?
शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या तीन मूर्ती होत्या. मग गुरुजी म्हणाले,

“आता यातील मूर्ती एकेकजण एकेक घ्या आणि दूरवर जाऊन या मूर्तींचा शिरच्छेद करून आणा. अट एकच… की तुम्ही हा शिरच्छेद करीत आहात, हे कुणी बघता कामा नये. जा आता.’
राजकुमार एक मूर्ती घेऊन गेला. आणि काही वेळातच तो मूर्तीचा शिरच्छेद करून घेऊन आला. मी हा शिरच्छेद करताना कोणीही पाहिलेलं नाही.’ राजकुमार म्हणाला. श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलानंही तसंच उत्तर दिलं. तिसरा शिष्य एक मूर्ती होती तशीच परत घेऊन आला. तो म्हणाला,
“गुरुवर्य तुमची अट पाळणं मला शक्‍य झालं नाही. मीही एकांतात शिरच्छेदासाठी गेलो होतो. कुणीही बघत नव्हतं. पण मनात विचार आला. परमात्मा तर सर्वत्र आहे. सर्वसाक्षी आहे. तो माझे हे कृत्य बघतच असणार.’ गुरुवर्यांनी त्या शिष्याला दीक्षा दिली. त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे असं ते म्हणाले.

कथाबोध
मांजर डोळे मिटून दूध पीत असतं. त्याला वाटतं आपल्याकडे कोणी बघत नाही. चोर अंधारात चोरी करतो. त्याला वाटतं मला कुणीही बघितलेलं नाही. पण परमेश्‍वर सर्वसाक्षी असतो. तो सर्व काही बघत असतो याची जाणीव कोणतेही कृत्य करताना माणसानं ठेवली पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)