कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो पकडला

कार्यकर्त्यांनी दिला दौंड पोलीसांच्या ताब्यात

राजेगाव – राजेगाव (ता. दौंड) जवळील राशीन-भिगवण महामार्गावर राशीन (ता. कर्जत जि. अहमदनगर)च्या बाजारातून भिगवणच्या दिशेने गाय, वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने पकडून दौंड पोलिसांच्या ताब्यात दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राशीन येथून एक पीकअप टेम्पो (क्र. एमएच 45 टी 3595) यामध्ये एक रेडी, एक जर्सी गाय व 8 लहान वासरे घेऊन भिगवण मार्गे पुण्याकडे निघाला असताना राशीन येथे तो विठ्ठल शेगर यांच्या निदर्शनास पडला, त्यानंतर त्यांनी मित्राची दुचाकी (क्र. एमएच 16 ऐझेड 2762) वरून टेम्पोच पाठलाग केला. राजेगाव फार्म (ता. दौंड) जवळ बजरंग दलाचे कार्यकर्ते विठ्ठल साहेबराव शेगर (रा. थेरवडी, ता. कर्जत) यांनी हा टेम्पो पकडला त्यावेळी त्यांनी चालकाकडे चौकशी केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली; त्यानंतर चालकाने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत तेथून पसार झाला. त्यानंतर सदर जनावरांसह भरलेला टेम्पो दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस नाईक देवकाते व होमगार्ड कांबळे यांनी सदर पिकअप दौंड पोलीस ठाण्यात नेला. पिकअप टेम्पोसह 20 हजार किमतीची काळी पांढरी जर्सी गाय व 16 हजार किमतीची वासरे असा एकूण दोन लाख 36 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेगाव व भिगवण परिसरात अशी जनावरे कत्तल केली जात आहेत. या भागातून फार मोठ्या प्रमाणावर लहान-मोठ्या जनावरांची तस्करी केली जाते. या तस्करीला आळा बसने गरजे आहे. जर कोणी जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करीत असेल तर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्याना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)