कतरिना लिहीणार फिल्मी प्रवासाबाबत पुस्तक

कतरिना कैफ बॉलिवूडमधील आपल्या प्रवासाबाबत एक पुस्तक लिहीण्याचा विचार करते आहे. या पुस्तकात ती आपल्या फिल्मी करिअरमधील प्रत्येक उतार चढावाबाबत सविस्तर लिहीणार आहे. कतरिनाने 2003 साली “बूम’सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तिच्या अभिनय क्षमतेबाबत खूपच टीका झाली होती.

विश्‍लेषकांनी तिच्याकडून काहीही अपेक्षा करता येत नसल्याचे स्पष्ट म्हटले होते. मात्र या टीकेला सामोरे जाताना खच्चीकरण होऊ न देता त्यातून सकारात्मक संदेश घेण्याचा प्रयत्न कतरिनाने केला. तिने बॉलिवूडमधील आघाडीच्या ऍक्‍ट्रेसचा मान मिळवण्यासाठी स्वतःला त्या दृष्टीने तयार केले. या सगळ्या तयारीच्या प्रवासाचे वर्णन चाहत्यांना सांगण्यासाठी एक पुस्तकच लिहीण्याचा आपला बेत असल्याचे कतरिनाने म्हटले आहे. हाच प्रवास ती आपल्या पुस्तकामध्ये मांडणार आहे.

कतरिनाने गेल्या 15 वर्षांमध्ये खूप समस्यांचाही सामना केला आहे. या समस्यांमधून मार्ग काढताना कतरिनाला आपल्या करिअरची उंची वाढवायलाच मदत झाली आहे. आपल्या करिअरच्या बाबतीत ती खूपच संतुलित विचार करते आहे. म्हणूनच यशाबरोबर अपयशालाही तिने स्वाभाविकपणे स्वीकारले आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो, असे म्हणतात. आपल्या अनुभवातून सतत काही ना काही शिकत राहण्याची तयारी कतरिनाने ठेवली आहे. त्यामुळेच या अनुभवांना शब्दबद्ध करण्याची तिची ईच्छा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)