कणसापासून बनवलेल्या गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेला लाखो भाविकांची भेट

गोंदवले – गोंदवले बुद्रुक (ता. माण) येतील श्री ब्रह्मचैतन्य समाधी मंदिरात पुणे येथील प्रशांत कुलकर्णी यांनी मक्‍याच्या कणसातून बनवलेल्या प्रतिमेला लाखो भाविकांनी भेट दिली. श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जात असून महोत्सवात राज्यासह देशातून व परदेशातून अनेक भाविक येत असतात. प्रत्येकजण आपापल्यापरीने येथे सेवा करत असतो. श्री ब्रह्मचैतन्य समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वारा पुढील भव्य अशा पटांगणात ही प्रतिकृती तयार केली केली आहे. ही किमया चिंचवड येथील प्रशांत कुलकर्णी यांनी साधली आहे.

प्रशांत कुलकर्णी यांच्या मनात मक्‍याच्या कणसांपासून महाराजांची प्रतिमा साकारण्याची कल्पना आली. कल्पना सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. यासाठी त्यांनी लोखंडाचा नऊ फुटी सांगाडा तयार केला. पिवळ्या, पांढऱ्या व तांबूस रंगाची कणसे गोळा केली. ती सूसुत्रपणे सांगाड्यावर बसवली. कोणताही कृत्रिम रंग न वापरता कणसं भाजून प्रतिमा साकारली. लोहाराच्या भात्याने कणसं भाजून डोळे, केस, मिशी, गळ्यातील माळ साकारले आहेत. ही प्रतिमा पाहून भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुलकर्णी मागील पंधरा वर्षांपासून गोंदवले येथे महाराजांची सेवा करत आहेत. आजपर्यंत त्यांनी हस्तकला व चित्रकलेच्या माध्यमातून महाराजांची प्रतिमा साकारली. मुख्य सभा मंडपात मण्यांच्या जपमाळेपासून बनविलेली श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर, श्री रामदास स्वामी, श्री हनुमान यांची त्रिमिती प्रतिमा भाविकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू आहे. दरम्यान, या कलाकृतीला लाखो भाविकांनी भेट दिली भेट दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)