कणखर मातृत्व

डॉ. सुरेखा कोठेकर

नुकत्याच झालेल्या मातृदिनानिमित्त हळव्या, प्रेमळ, मायाळू आईच्या आत दडलेल्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी आवश्‍यक असलेल्या या कणखर, खंबीर मातृत्वालाही सलाम …

ताई ,मी आता येणार नाही हं कामाला, शेतीच्या गावी चाललो सर्वजण.. मी चाटच..15 वर्षे माझ्याकडे असलेल्या आणि शहरी वातावरणात रूळलेल्या बाई एकदम गावाकडे ? का हो घेतला हा निर्णय ? अहो , तिथे हक्काचे घर आहे आणि आम्ही सर्व राबलो तर मुलाला इथल्यापेक्षा नक्कीच चार पैसे जास्त मिळतील .तसे त्याच्या आणि ह्यांच्या मनात नाहीये फारसे पण मुलाच्या भल्यासाठी घेतला मी हा निर्णय…
अग, एकुलता एक मुलगा ,कशाला पाठवतेस अमेरिकेत ? तुम्हा दोघांना बरेही नसते हल्ली …..

नाही ग,त्याचे करिअर तेथे राहुन घडणार असेल तर माझी पूर्ण परवानगी आहे. आमचे तर चालूच आहे ग, तुम्ही सर्व आहातच पण या एका कारणापायी आणि मायेच्या बंधानी त्याच्या करिअरची रूखरूख मी त्याला आणि मलाही ठेवणार नाही. प्रसंग गावी जाणे असो वा परदेशी पाठवणे असो ,यात जाणवते ते हळव्या,प्रेमळ आईच्या आत दडलेले आणि अशा प्रसंगातून समोर आलेले कणखर मातृत्व …. पुरातन काळातही कितीतरी स्त्रियांनी आपल्या मायेच्या पाशात मुलांना न अडकवता असे खंबीर निर्णय घेतलेले आहेत.आजकाल तर स्वतःचे करिअर सांभाळतानाही मुलांच्या भवितव्याचा विचार करुन योग्य निर्णय घेण्यासाठी स्त्रीने स्वतःला अजुन खंबीर केले आहे.त्यात तिची माया,प्रेम,हळवेपणा हरवले असे नाही पण प्रसंगानूरुप तिने त्याचा पाश न करता मुलांना निर्णयस्वातंत्रय दिले आहे आणि प्रसंगी वेगळे करिअर किंवा वेगळे निर्णय यात ती मुलांच्या पाठीशी भक्कम उभी रहाताना दिसत आहे .प्रेमाबरोबरच तिचा कणखरपणा हा तिच्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सक्षम वाढीसाठी ,पोषक गुणच ठरला आहे…नाही का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)