कणकवलीतील एसटी अपघातात 22 प्रवासी जखमी

सिंधुदुर्ग – कणकवलीहून नांदगाव मार्गे आयनल येथे जाणाऱ्या वस्तीच्या एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ तिठा येथे घडला. या एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात नांदगाव असलदे आयनल या भागातील अनेक प्रवासी होते. कणकवलीहून आयनलकडे जात असताना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताच्या परिसरातच 108 ही रुग्णवाहिका असल्याने जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गावातील शेकडो ग्रामस्थ रुग्णालयात आल्याने मोठी झुंबड उडाली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)