कडेपठार पतसंस्थेने घोषित केला 12 टक्‍के लाभांश

जवळार्जून – कडेपठार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली. संस्थेने सभासदांना 12 टक्के लाभांश घोषित केला आहे. यावेळी शैक्षणिक, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ज्ञानेश्वर भोईटे यांना कडेपठार समाजभूषण तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल संदीप काळाने यांना कडेपठार कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात पुरंदर तालुक्‍यातील विद्यार्थ्यांचा शालेय दप्तर देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, डॉ. रामदास कुटे, निवृत्त सनदी अधिकारी संभाजी झेंडे, दिलीप बारभाई, जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम इंगळे समेत अध्यापक, विद्यार्थी आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ सोनवणे यांनी केले. तर आभार रोहिदास कुदळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)