कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

कडेगाव – येथील लघु पाटबंधारे तलावाचा टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करण्याबाबत, तसेच टेंभूचे शेतीसाठीचे आवर्तन नियमित देणेबाबत टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्‍वासन न पाळल्याने डी. एस. देशमुख व मोहनराव यादव यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांची पाणीपट्टी घेतली जाते.परंतु पाणी वेळेत दिले जात नाही.

कडेगाव तलावात कायमस्वरुपी पाणी सोडावे म्हणून अनेकवेळा मोर्चे काढण्यात आले परंतु अद्याप याबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. म्हणून आज येथे तहसिल कार्यालया समोर संतप्त शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

-Ads-

यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाणीप्रश्‍नी टेंभूचे सहायक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांना धारेवर धरले.त्यांनी कडेगाव तलावात पाणी सोडण्यात येईल व अन्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. तर तहसीलदार अर्चना शेटे यांनी आंदोलक व टेंभूचे अधिकारी यांच्यात समन्वय साधला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)