कडूस विद्यालयाला संगणक संच भेट

सुपा – पारनेर तालुक्‍यातील कडूस माध्यमिक विद्यालयाला संगणक संच भेट देण्यात आला. संतोष गायककवाड यांनी गावातील युवक, शिक्षक, सरकारी अधिकारी, वकील, उद्योजक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांना व्हॉटस्‌ ऍपवर वर्गणीची मागणी करून जमलेल्या पैशातून शाळेसाठी संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली. तहसीलदार स्वप्निल रावडे, निवृत्त केंद्रप्रमुख नाना गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज पाटील, पुणे येथील व्यापारी महेश रावडे, संतोष गायकवाड, मनसेचे तालुका सचिव नारायण नरवडे, मुकिंद मुंगसे, किसन गायकवाड, प्रवीण रावडे यांनी संगणकासाठी आर्थिक मदत केली. दादा दिवटे यांच्या हस्ते विद्यालयाला संगणक देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)