कडूसमध्ये कराटे स्पर्धांना प्रतिसाद

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यात खासगी शाळांमध्ये कराटे प्रशिक्षणावर भर देण्यात येत असून त्याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कडूस येथील डायनमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “अभय मेरीटियल आर्ट’ या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कराटेची येलो, ऑरेंज, ग्रीन व ब्लू बेल्टची परीक्षा घेण्यात आली. या कराटे परीक्षेला शाळेचे 60 स्पर्धक सहभागी झाले होते. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांचे कराटे प्रशिक्षक दिनकर बच्चे, रंगालाल मगर व सोमनाथ मगर यांनी योग्य मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अद्यक्ष प्रताप गारगोटे, संस्थेच्या व्यस्थापिका जयश्री गारगोटे,संचालक मंडळ व प्राचार्य शिवाजी गुंजाळ यांनी सर्वानी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)