कडाचीवाडी येथून नवविवाहिता बेपत्ता

महाळुंगे इंगळे- कडाचीवाडी (ता. खेड) येथून 20 वर्षीय नवविवाहिता गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी यांनी दिली. अनिता विनोद काळे (वय 20, सध्या रा. कडाचीवाडी, ता. खेड, मूळ रा. हिंगणे पिंपरी, ता. जामनेर, जि. जळगाव) असे बेपत्ता झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिचा पती विनोद प्रल्हाद काळे (वय 23, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

बेपत्ता काळे हिचे वर्णन पुढीलप्रमाणे; रंग काळा सावळा, अंगाने मध्यम, डाव्या पायाची बोटे लहान, उजव्या हातावर विनोद नाव गोंदलेले, नेसणीस गुलाबी रंगाची साडी, लाल रंगाचा झंपर, उंची पाच फुट, डोक्‍याचे केस काळे, डोळे काळे, गळ्यात मनिमंगळसूत्र, कानात रिंगा, मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता येते. या वर्णनाच्या विवाहितेबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अथवा कोठे आढळल्यास त्यांनी चाकण पोलीस ठाणे अथवा 02135 249333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाकण पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)