कडाक्‍याच्या थंडीमुळे कोपरगावात पेटल्या शेकोट्या

संग्रहित छायाचित्र...

कोपरगाव: थंडीची लाट आल्याने शहरासह तालुका गारठला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळीही थंडीने नागरिक कुडकुडत आहेत. त्यामुळे या थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटत असल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्‍यात थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर थंडी जाणवत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आबालवृद्ध गरम कपड्यांचा वापर करत आहेत. तालुक्‍यात गेल्या अनेक वर्षांत तापमानाचा पारा इतका खाली गेला नव्हता. सध्या दुपारचे दोन वाजले तरी नागरीक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. सध्या गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी जरी पोषक असली, तरी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे नागरिक या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्‍यात कडाक्‍याची थंडी पडल्याने तालुका गारठला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)