कडक हेडमास्तर सुमित्राताईंचा रेकॉर्ड

45 खासदारांचे निलंबन; इतिहासातील दुसरी मोठी कारवाई

नवी दिल्ली: कडक हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी दोन दिवसांत 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई करून एक मोठा रिकॉर्ड बनविला आहे. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात एकाच अध्यक्षाने केलेली ही कारवाई आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी कारवाई होय, हे येथे उल्लेखनीय.

1989मध्ये सर्वात मोठी कारवाई
महत्वाचे सांगायचे म्हणजे, स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात एकाच अध्यक्षाने केलेली ही कारवाई आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी कारवाई होय. संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई 1989 मध्ये करण्यात आली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी ठक्कर आयोगाचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मागणी काही खासदार करीत होते. यावेळी गोंधळ करणाऱ्या 63 खासदारांना निलंबित करण्यात आली होती. 2004च्या फेब्रुवरीमध्ये 17 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. तर 2015 मध्ये 25 खासदारांवर कारवाई करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी संसदेच्या संयुक्त समितीमार्फत करण्याची मागणी रेटून लावली आहे. यामुळे लोकसभेचे कामकाज सारखे तहकूब करावे लागत आहे. अशातच अन्नाद्रमुकचे खासदार वेलमध्ये येवून सारखी घोषणाबाजी करीत असल्यामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण होत होता.

लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी वारंवार ताकीद दिल्यानंतरही अन्नाद्रमुकचे खासदार आपल्या जागी जायला तयार नव्हते. यामुळे अध्यक्षांनी 24 खासदारांवर कडक कारवाई करीत चार दिवसासाठी निलंबित केले. यानंतर गुरूवारी सुध्दा गोंधळ करणाऱ्या आणखी 21 खासदारांना चार दिवसासाठी निलंबित केले. यात तेलगू देसम पक्षाचे 13, अन्नाद्रमुकचे सात आणि आणखी एका खासदाचा समावेश होता.

लोकसभेत होणाऱ्या सारख्या गोंधळामुळे सुमित्राताई महाजन यांनी अलिकडेच कठोर नियम बनविण्याची ताकीद दिली होती. यासाठी नियम समितीची बैठकही बोलाविण्यात आली होती. अशातच, महाजन यांनी 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)