कडक उन्हाळ्यात खा थंडगार कलिंगड; मिळतील आश्चर्यकारक फायदे

मुंबई :  ऊनाचा तडाखा वाढत आहे. कडक उन्हात बाहेर पडताच थकवा आणि ऊर्जेची कमतरता वाटू जाणवते. यामुळे उन्हाळ्यात कलिंगड हे वरदान आहे. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहे. उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जाही बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उन्हाळ्यात शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून कलिंगड या फळाचे सेवन करावे. कलिंगडाचे आरोग्यदायी फायदे खास वाचकांसाठी…

कलिंगड खाण्याचे फायदे

किडनी स्टोनवर गुणकारी

किडनी स्टोन दूर करण्यास कलिंगड मदत करते. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम किडनीला निरोगी ठेवते. पोटॅशियमसोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते. नियमितपणे कलिंगड खाल्ल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होते.

कॅन्सरपासून बचाव करते

कलिंगडमध्ये अँटीऑक्‍सीडेंट आणि व्हिटॅमिन सी तसेच इतर अँटीऑक्‍सीडेंटचा उत्तम स्रोत आहे. हे कॅन्सरचे कारण मानल्या जाणाऱ्या विषाणूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. अनेक संशोधनांमध्ये लाइकोपेनचे सेवन प्रोस्टेट कॅन्सरसाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. कलिंगडमध्ये लाइकोपेन तत्त्व आढळून येतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

कलिंगडाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे स्वस्थ ठेवण्यात मदत होते. याच्या सेवनाने रातांधळेपणा आणि मोतीबिंदू यासारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहिले जाऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)