कडकनाथच्या नावाखाली पावणे दहा लाखांची फसवणूक

ड्रीम एम्पायर कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा

कराड – कुकुटपालनासाठी कडकनाथ पक्षी देतो, असे सांगून ड्रीम एम्पायर नावाच्या कंपनीने ग्राहकांची 9 लाख 72 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पाच जणांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विपुल पानसरे, सुवर्णा लोखंडे (रा. आष्टा, ता. वाळवा), प्रवीण पवार (रा. मोशी-पुणे), राम कांबळे (रा. विश्रामबाग-सांगली), सुहास गोरे (रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिता दिलीप करमळकर (रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुकुटपालन व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी सुनिता करमळकर या 2017 मध्ये असद (ता. कडेगाव) येथे गेल्या होत्या. प्रशिक्षणादरम्यान विपुल पानसरे याने सुनिता करमळकर यांना महिला सक्षमीकरणाचे काम करणार का? अशी विचारणा केली असता त्यांनी घरच्यांना विचारून कळविते, असे सांगितले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेठरे बुद्रुक येथे कुकुटपालनासाठी मिटींग झाली. यामध्ये रेठरे बुद्रुकमधील बरेच शेतकरी तयार झाले. त्यानंतर अंकलखोप येथे झालेल्या मिटींगमध्ये सुवर्णा लोखंडे, प्रवीण पवार, राम कांबळे, विपुल पानसरे, सुहास गोरे यांनी आमची ड्रीम एम्पायर नावाची कंपनी असून आम्ही महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करतो आणि रोजगार उपलब्ध करून देतो, असे सांगितले. यावेळी त्यांनी 3,755 रूपयांना आपण 55 पक्षी देतो व 5 महिन्यांनी आपण तेच पक्षी 600 रूपये किलोने घेतो, अशी

माहिती देऊन गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर सुनिता करमळकर यांनी गावात मिटींग घेऊन पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर सुनिता करमळकर यांच्यासह 15 ग्राहकांनी 9 लाख 72 हजार रूपये ड्रीम एम्पायर कंपनीच्या नावे भरले. त्यानंतर सन 2017 पासून कंपनीने उत्पन्नाचे आमिष दाखवून व कुकुटपालनासाठी कडकनाथ
कोंबडी देतो, असे सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कंपनीच्या पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)