कठोर शिक्षा गरजेचीच (भाग-१)

लहान मुलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने पोक्‍सो कायद्यात सुधारणा केली आहे. असे गुन्हे करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचे हे पाऊल अत्यंत सकारात्मक असून, त्याची अंमलबजावणीही तितक्‍याच कडक पद्धतीने होणे अपेक्षित आहे. कारण कठोर कायदे अनेक असले, तरी अंमलबजावणीच्या पातळीवर यंत्रणा तोकडी पडल्याने गुन्हेगारांना फायदा मिळतो.

मुलांचे लैंगिक शोषण असो वा मुलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या घटना असोत, अशा गुन्ह्यांची संख्या वाढत चाललेली असताना कायदा सक्षम असणे गरजेचे आहे. 2012 मध्ये मुलांना लैंगिक हिंसा, छेडछाड, बलात्कार आदी गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी पोक्‍सो कायदा म्हणजेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला. परंतु लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार, हिंसा थांबलीच नाही; उलट अशा घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. या घटनांनी माणुसकीलाच काळीमा फासला असून, जगभरात भारताची प्रतिमा या घटनांमुळे मलीन झाली आहे. गुन्हेगारांना कायद्याचे भय उरलेले नाही, हे लक्षात येताच पोक्‍सो कायद्यात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली. मोदी सरकारने आता या बाबतीत सकारात्मक पाऊल टाकले आहे. पोक्‍सो कायदा अधिक सक्षम करून अशा गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच केली. प्रोटेक्‍शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्‍श्युअल ऑफेन्सेस ऍक्‍ट या नावाने हा कायदा ओळखला जातो. तथापि, या कायद्यांतर्गत सुरुवातीला शिक्षेची तरतूद पुरेशी नव्हती. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे शक्‍य होत नव्हते आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतानाच दिसत होत्या. गेल्या तीन वर्षांत सुमारे एक लाख अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या. यातील अनेक प्रकरणे तर गुन्हेगारांचे अत्यंत बीभत्स स्वरूप दाखविणारी होती.

कठोर शिक्षा गरजेचीच (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2014 च्या तुलनेत 2016 मध्ये मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चक्‍क 20 टक्‍के वाढ झाल्याचे दिसून आले असून, विद्यमान कायदा मुलांचे संरक्षण करण्यास पुरेसा नाही, हे यावरूनच लक्षात येते. देशभरात अल्पवयीनांवर झालेल्या बलात्काराच्या घटनाही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षभरात 82 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराची प्रकरणे केवळ काही कुटुंबांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला शरम वाटायला लावतात.

– अॅड. प्रदीप उमाप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)