कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणी साकुरमध्ये सर्वधर्मीय निषेध मुकमोर्चा

कठुआ व उन्नाव येथील घटनांच्या पार्श्वभुमीवर अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निषेध नोंदविणारा सर्वधर्मीय मुक निषेध मोर्चा शनिवारी साकुरमध्ये काढण्यात आला होता.सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.साकूर चौफुलीपासुन मोर्च्याला सुरुवात झाली. आंबेडकर नगर, बाजारपेठ मार्गे  ग्रामसचिवालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला.

यावेळी आयोजित सभेत  व्यासपीठावर साकूरचे उपसरपंच व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रऊफ शेख, माजी उपसरपंच व मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष दादा पटेल, रफिक चौगुले, दादा लोंढे, बाळु कर्डिले, भागा खेमनर, ईस्माईल शाह, कलिम पटेल, आरिफ मोमीन आदी उपस्थित होते.

यावेळी आपली मनोगते व्यक्त करताना सर्वानीच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन या घटनेकडे मानवी समाजावरील हल्ला या भावनेने  बघण्याची गरज व्यक्त केली. शाळकरी मुलींच्या हस्ते मंडलाधिकारी बाळासाहेब कोकणे व घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांना निवेदन देण्यात आले. अतिशय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा पार पडला व मोर्चामुळे परिसरातील व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये म्हणुन एकही दुकान बंद न ठेवता, कोणतीही घोषणाबाजी न करता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)