कठुआ बलात्कार-हत्या प्रकरणी आजपासून कोर्टात सुनावणी

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर करुन या सुनावणीला सुरुवात होईल.

दरम्यान या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर आता पीडितेच्या वकिलांना धमकावण्यात येत आहे. पीडितेच्या बाजूनं केस लढणाऱ्या दीपिका सिंह राजावत यांना आरोपींच्या समर्थकांकडून धमकावण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

चिमुकल्या असिफावर अमानुष अत्याचार

आठ वर्षे वयाच्या असिफचे 10 जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर असिफाची हत्या केली.  17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)