तिरुवनंतपुरम : देशभरात कठुआ आणि उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणांमुळे संतापाची लाट उसळलेली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत समाजमाध्यमांवर आवाज उठवला जात आहे. मात्र असे असले तरीही काही लोकांकडून बुरसटलेल्या विकृत विचारांचे प्रदर्शनही यावेळी होत आहे. कोटक महिंद्र बँकेच्या एका असिस्टंट मॅनेजरने अशाच पद्धतीने केलेल्या एका ट्वीटमुळे त्याला कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय बँकेच्या प्रशासनाने घेतला आहे.

विष्णू नंदकुमार या पलारिवत्तोम येथिल शाखेच्या असिस्टंट मॅनेजरने हे ट्विट केले होते. कठुआ बलात्कार प्रकरणी लिहिताना त्याने ट्वीट केले होते, ” बरं झाले तिला या वयात ठार मारण्यात आले, नाहीतर ती मोठी झाल्यावर आत्मघातकी हल्लेखोर बनून भारताविरोधात बॉम्ब टाकायला आली असती.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)