कठुआ बलात्कार प्रकरण; ‘त्या’ तरुणीच्या घरावर दगडफेक

नवी दिल्ली – कठुआ बलात्कारप्रकरणी चित्र रेखाटणाऱ्या केरळमधील तरुणीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. दुर्गा मालती असे या  तरुणीचे नाव असून कठुआ प्रकरणावरील चित्र सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर तिला जिवे मारण्याच्या धमक्या देखील येत असल्याचं वृत्त आहे.

दुर्गा मालती ही केरळमधील चित्रकार असून कठुआ बलात्कार प्रकरणावर तिने काही चित्रं काढली होती. हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्माच्या प्रतिकांचं चित्रण केल्याने तिच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. तिच्या एका चित्रात त्रिशूळावर पुरूषांचे गुप्तांग दाखवण्यात आले होते. तिने ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मावरही काही चित्र रेखाटली आहेत.  तिच्या या चित्रांवरुन वाद निर्माण झाला आहे. दुर्गा मालतीने हिंदू धर्माचा अपमान केला असून तिने हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी तिच्या घरावर दगडफेक केली. दुर्गा मालतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन या बाबतची माहिती दिली आहे.

-Ads-

ഇന്നലെ രാത്രി അവർ വീടിനുനേരെ കല്ലെറിഞ്ഞു.. വീട്ടിലെ വാഹനത്തിന്റെ ചില്ല് എറിഞ്ഞു ഉടച്ചു… ഇന്നലെ രാത്രി തന്നെ…

Posted by Durga Malathi on Thursday, 19 April 2018

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)