कठुआ बलात्कार प्रकरणातील दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले

श्रीनगर  – जम्मू काश्‍मीरमधील कठुआ जिल्ह्यात घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात अटक झालेल्या लोकांच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या भाजपच्या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज स्वीकारले. लाल सिंग आणि चंदेर प्रकाश गंगा अशी राजीनामा दिलेल्या दोघा मंत्र्यांची नावे आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे या दोघांचे राजीनामे आज सकाळी पोहोचले. हे राजीनामे लगेचच पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल एन.एन. व्होरा यांच्याकडे पाठवून देण्यात आले.

कठुआ बलात्कार प्रकरणी जम्मू काश्‍मीर पोलिसांनी एका मंदिराच्या व्यवस्थापकाच्या भाच्याला अटक केली होती. त्या अटकेच्या निषेधार्थ गंगा आणि सिंग यांनी 1 मार्च रोजी मोर्चा काढला होता. तपास पूर्ण होईपर्यंत या विषयावर कोणीही भाष्य करू नये, अशी पक्षाची सूचना असतानाही या दोन्ही मंत्र्यांनी आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याने त्यांच्यावर टीका व्हायला लागली होती. त्यामुळेच त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले असे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले. या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे जम्मू काश्‍मीर सरकार मंत्र्यांची संख्या आता 22 झाली असून त्यामध्ये 9 मंत्री भाजपचे आहेत. पीडीपीने गेल्या महिन्यात अर्थमंत्री हसीब द्राबू यांना हटवले होते. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये तीन मंत्र्यांच्या जागा रिक्‍त झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)