कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू

सर्व आठही आरोपींनी फेटाळले आरोप


स्वत:च केली नार्को टेस्ट घेण्याची मागणी

कठुआ – कठुआ येथे आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींवरील खटल्याच्या सुनावणीला आज प्रारंभ झाला. यातील आठही आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून या प्रकरणात आमची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी त्यांनी स्वत:च न्यायालयात आज केली. जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय गुप्ता यांच्या पुढे ही सुनावणी सुरू झाली असून त्यांनी क्राईम ब्रॅंचला यातील सर्व आरोपींना त्यांच्यावरील आरोपपत्राची प्रत सादर करण्याची सूचना करून या प्रकरणाची सुनावणी 28 एप्रिल पर्यंत तहकुब केली आहे. या आठही आरोपींनी जामीनासाठी अर्ज केले आहेत. यातील आठवा आरोपी हा अल्पवयीन आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात मुस्लिम आदिवासी समुदायातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा खून केल्याचा या आरोप या आठ जणांवर आहे. देवीस्थान मंदिराचे व्यवस्थापक सांझी राम हे या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणात आरोपींकडून चार लाख रूपयांची लाच घेऊन यातील सर्व महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप असलेला सब ईन्स्पेक्‍टर आनंद दत्ता आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज हेही या प्रकरणात आरोपी म्हणून कोर्टापुढे सादर करण्यात आले आहेत. या सुनावणीच्यावेळी मुख्य आरोपी सांझी राम यांची कन्या मधु हिने न्यायालयाबाहेर निदर्शने करीत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)