कठुआ प्रकरण; पेन्टींग काढणाऱ्या दुर्गाच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक

तिरुअनंतपूरम : कठुआ बलात्कार प्रकरणावर संपूर्ण देशातील सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. त्यात केरळमधील पलक्कडमध्ये राहणाऱ्या दुर्गा यांनी काढलेल्या पेन्टींग वरुन नवीन वादळ उठल्याचे  झाल्याचे दिसत आहे. या पेन्टींगमध्ये हिंदु देवदेवतांचा अपमान करणारे व वादग्रस्त पेंटीग असल्याचा आरोप करित, लोकांनी दुर्गा यांच्या घरावर दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.

अज्ञात लोकांनी दुर्गा याच्या घरावर दगडफेक केली आहे.  या दगडफेकीत दुर्गा याच्या घरासमोर दगडाचा खच पडलेला असून दारात उभ्या असलेल्या एका गाडीची काच फोडली गेली आहे. याअगोदर फेसबुकवरही काही लोकांकडून दुर्गा यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेवर बोलताना दुर्गा यांनी, काही दिवसापासून कार्टूनवर मला व माझ्या मित्रांना काही अज्ञात लोकांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सागितले. घरावर दगड केल्याप्रकरणी दुर्गा यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)