कठुआ प्रकरंणातील बळीची ओळख उघड केल्याबद्दल माध्यमांना नोटीसा

नवी दिल्ली – कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणी बळीची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने आज प्रसार माध्यमांना नोटिसा जारी केल्या आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ येथे 8 वर्षंच्या एका बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. सदर बालिकेची ओळख उघड केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये? यासाठी उच्च्च न्यायालयाने खुलासा मागवणारी नोटीस माध्यमांना जारी केली आहे.

भटक्‍या बकेरवाल मुस्लिम समाजातील आठ वर्षे वयाच्या एका बालिकेचे कठुआमधील रसना गावाजवळून अपहरण करण्यात आले होते. आठ दिवसांनंतर तिचा मृतदेह त्याच भागात सापडला होता. या प्रकरणी पोलीसांनी एका अल्पवयीनासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हत्या करण्यापूर्वी सदर बालिकेला मादक द्रव्याच्या अमलाखाली ठेवून सामूहिक बलात्कार बलात्कार केल्याचे आरोपपत्रावरून उघड झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)