कठुआ, उन्नाव बलात्काराच्या निषेधार्थ कॉंग्रेसचा आज राज्यभरात कॅंडल मार्च

मुंबई – जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ येथील आसिफा या 8 वर्षीय बालिकेवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या अमानुष बलात्काराच्या निषेधार्थ उद्या, रविवार, दि. 15 एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात कॅंडल मार्च काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे ठाणे येथे कॅंडल मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण दुर्देवाने सरकार महिला सुरक्षेसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून महिला व बालिकांवरील अत्याचारात 36 टक्के वाढ झाली आहे. याच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्ष उद्या राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कॅंडल मार्च काढणार आहे. खासदार अशोक चव्हाण ठाणे येथे कॅंडल मार्चमध्ये सहभागी होतील. उद्या सायंकाळी 7 वाजता ठाणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोरून हा मार्च सुरु होऊन ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)