कठुआवरून भाजपच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा

श्रीनगर – कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण देशातील वातावरण तापल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्‍मीरमधील भाजपच्या दोन मंत्र्यांनी आज राजीनामा दिला. चौधरी लालसिंह आणि चंदर प्रकाश अशी त्या मंत्र्यांची नावे आहेत. संबंधित प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ झालेल्या मेळाव्यात सहभागी झाल्यावरून दोन्ही मंत्री वादाच्या केंद्रस्थानी सापडले.

मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या त्या राज्यातील विरोधी पक्षांनी लावून धरल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सोपवले. आता उद्या (शनिवार) जम्मूत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये दोन्ही मंत्र्यांच्या भवितव्यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये पीडीपी आणि भाजप युतीचे सरकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)