कठुआतील भाजप मेळाव्यात राष्ट्रध्वजाचा अवमान

जम्मू – जम्मू काश्‍मीर मधील भाजप नेते व स्थानिक आमदार राजीव जस्त्रोतिया यांनी कठुआ जिल्ह्यात आयोजित केलेल्या भाजपच्याल एका मेळाव्याच्यावेळी तेथे राष्ट्रध्वज उलटा फडकवण्यात आल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रध्वज सन्मान कायद्यानुसार काही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी विनोद निझवान यांनी पोलिसांत तक्रार दिली होती त्यांची तक्रार जस्त्रोतिया यांच्या विरोधात होती पण पोलिसांनी तक्रारीत मात्र त्यांचे नाव घेतलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापी त्यांच्या या कृतीमुळे आमच्या राष्ट्रीय भावना दुखावल्या असून या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)