कट्‌टरपंथी मुस्लिमांनी 30 दिवसात आत्मसमर्पण करावे- चीन

बीजिंग (चीन): चीन सरकारने मुस्लिम कट्‌टरपंथियांविरोधात कठोर भूमिका घेत त्यांना 30 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवाद आणि फुटीरवाद्‌यांसह सर्व कट्‌टरपंथीय मुस्लिमांनी 30 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करून आपले गुन्हे कबूल करावेत. न्यायसंस्थांसमोर अशी कबुली देणारांबाबत नरमाईने विचार केला जाईल आणि त्यांच्या शिक्षेतही सौम्यपणा दाखवला जाईल असे चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शिनजियांग प्रांतातील हामी शहराच्या सरकारने सोशल मीडियावर हा आदेश जारी केलेला आहे.

चीनमध्ये उईगर मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणावरील अटकसत्राबाबत चीनला अनेक पातळ्यांवरून टीका सहन करावी लागत आहे. शिनजियांग प्रांतातील उईगर मुस्लिम आणि ख्रिश्‍चनेतर नजरकैदेत असल्यासारखेच वागवले जात आहेत. सामान्यत: चीन अशा बाबतीत होणाऱ्या टीकेकडे लक्ष देत नाही. अल्पसंख्याकांचा धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत; पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्हाला कठोर धोरण स्वीकारणे भाग पडत असल्याचे स्पष्टीकरण चीनकडून केले जाते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)