‘कट्यार’च्या आठवणींनी रसिक झाले घायाळ

पुणे  – ‘दिन गेले भजनावीण सारे’,’घेई छंद मकरंद’, ‘सुरत पिया की छिन बिसराये’, ‘लागी करेजवा कटार’ यासह कट्यार काळजात घुसली नाटकातील एकाहून एक सुरेल अशा अजरामर नाट्यगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांची 34 वी पुण्यतिथी, नटसम्राट बालगंधर्व यांची 50 वी पुण्यतिथी, छोटा गंधर्वांची जन्मशताब्दी तसेच प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर लिखीत संगीत नाटक ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘सुवर्ण महोत्सवी कट्यार: आठवणींसह कथामय नाट्यसंगीत’या विशेष कार्यक्रमाचे.
डॉ.वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर सल्लागार विजयकांत कुलकर्णी, सुरेश रानडे आदी मान्यवर उपस्थितहोते. कार्यक्रमाची संकल्पना लेखन, दिग्दर्शन पंडित जयराम पोतदार यांचे होते. गायिका कल्याणी पोतदार-जोशी, रवींद्र कुलकर्णी, संजीव मेहंदळे, अभय जबडे आणि यश जोशी या कलाकारांनी सादर केलेल्यानाट्यपदांना रसिकांची भरभरून दाद मिळाली. त्यांनाजयराम पोतदार (ऑर्गन), संदीप पवार (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) या वादक कलाकारांनी सुरेल साथ संगत केली.
संजीव मेहंदळे यांनी सादर केलेले बिहागडा रागातील ‘या भवनातील गीत पुराणे’, रवींद्र कुलकर्णी यांनी सादर केलेले ‘मुरलीधर श्‍याम’ हे पुरीया कल्याण रागातील नाट्यपद रसिकांची विशेष दाद घेऊन गेले.कल्याणी पोतदार-जोशी यांच्या ‘करात उरली केवळ मुरली’ आणि ‘लागी करेजवा कटार’ या नाट्यपदांबरोबर रसिकांनीही ठेका धरला.कार्यक्रमाचे सूत्रधार प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी यांनीकट्यार काळजात घुसली या नाटकातील अनेक प्रसंग, त्या नाटकाशी संबंधीत महत्तावाच्या आठवणी सांगून कार्यक्रमात अधिकच रंगत आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)