कटुआ, उन्नाव घटनेच्या निषेधासाठी वकील रस्त्यावर

शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांक प्रवेशद्वाराजवळ निदर्शने


आरोपींना फाशी देण्याची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे- जम्मू काश्‍मीर येथील कटुआ आणि उत्तरप्रदेश येथील उन्नाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी वकील रस्त्यावर उतरले आहेत. वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशन आणि ऍडव्होकेट फोरम फॉर सोशल जस्टीस, पुणे महाराष्ट्रच्या वतीने नुकतीच शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांक प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटनांतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा बार असोएसिशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. रेखा करंडे, ऍडव्होकेट फोरम फॉर सोशल जस्टीस, पुणे महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष ऍड. शाहीद अख्तर, ऍड. इब्राहिम शेख, बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ऍड. हर्षद निंबाळकर, माजी सदस्य अहमदखान पठाण, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. औदुंबर खुने पाटील, ऍड. शिवाजीराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. कटुआ येथे आठ वर्षाच्या चिमुकलीवर 7 दिवस लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर उत्तरप्रदेश येथे 17 वर्षीय तरुणीवर सत्ताधारी भाजपच्या आमदाराने बलात्कार केला. न्याय मागणाऱ्या तिच्या वडिलांना ठार मारले. या दोन आणि अशा अनेक घटना देशात नुकत्याच घडल्या आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या पार्श्‍वभूमीवर कायद्याचा जरब बसण्यासाठी या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, अशी मागणी दोन्ही वकील संघटनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)