कटफळ ग्रामपंचायतचे कार्य कौतुकास्पद

बारामती- ग्रामपंचायत कटफळ ही छोटी ग्रामपंचायत असून देखील शासनाच्या निधीची वाट न पाहता विविध कंपन्यांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून केलेली विविध विकासकामे आदर्शवत आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कटफळ ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामे, भूमिपूजन आणि लोकार्पण आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी इंदापूर तालुक्‍याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद आध्यक्ष विश्वास देवकाते, रोहित पवार, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, संभाजी होळकर, राहुल वाबळे, जय पाटील, लीलाताई गावडे आणि उपसरपंच शरद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल माकर, उमेश लोखंडे,मुकिंद मदने, सारिका मोकाशी, कस्तुरा कांबळे, रेखा आटोळे, सतीश बोरावके, सुजाता झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणावर विकास करताना नागरिकांनीसुद्धा वेळेवर कर भरावा, विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, निर्व्यसनी राहावे, सामाजिक ऐक्‍य टिकवण्यासाठी प्रयत्न करावे, कुटुंब मर्यादित ठेवावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयाने शेतकरी, उद्योजक आदी वर्ग आर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी हे केवळ त्यांना गाजर दाखविण्यासारखे केलेआहे, त्यामुळे चुकीच्या लोकांना साथ देऊ नका. तसेच गावामध्ये एसटी चालू करण्यासाठी प्रयत्न करू, असेही अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच डॉ. कीर्ती संजय मोकाशी यांनी केले.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील आणि ग्रामसेवक सतीश बोरावके आभार केले. या प्रसंगी पियाजो कंपनीचे चेअरमन रवी चोप्रा, बारामती कॅटल फीड, कृषी विकास प्रतिष्ठान, मगरपट्टा सिटी, संजीवनी सक्षमीकरण संस्था, पत्रकार संतोष आटोळे, मधुबन हॉटेल व सीसीटीव्ही कॅमेरांसाठी अशोक शिंदे आदींनी विकासकामामध्ये सहकार्य केल्याबद्दल आणि कुस्तीमध्ये जिल्हा पातळीवर निवड झालेली सानिका कांबळे आदींचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  • दारूवाले आमदारला हफ्ता देतात?
    कटफळमध्ये दारुवाले कसा त्रास देतात, हे सांगताना एकाच वेळी अनेकजण सांगत असल्याने हवालदाराला हफ्ता देतात असे ऐकण्याऐवजी आमदाराला दारुवाले हफ्ता देतात हे ऐकल्याने हफ्ता कोणत्या आमदाराला हफ्ता देतात हे अजित पवारांनी विचारले त्यावर ग्रामस्थांनी आमदार नव्हे त हवालदार असे सांगिल्यावर पोलीस अधीक्षक यांनाच दारूचा उद्योग बघायला घेऊन येतो, असे सांगत ग्रामस्थांच्या तक्रारीचा निपटारा केला.
  • रेल्वेमुळे कटफळचे महत्त्व वाढणार
    प्रस्तावित दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारी रेल्वे लाइन कटफळमधून जाणार असल्याने कटफळचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे जमिनी विकू नका, त्याचे जतन करा आणि पुढील पिढीसाठी तरतूद करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)