कटप्पाप्रमाणे वरुण धवननेही प्रभासच्या पाठीत केला वार

बाहुबलीच्या पहिल्या भागाच्या अखेरीस कटप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्‍नाचे उत्तर आतापर्यंत बहुतेक प्रेक्षकांना मिळाले आहे. मात्र या अखेरच्या काही सेकंदांच्या दृश्‍याचा परिणाम अनेकांच्या मनावर कायमचा राहिला. वरुण धवनही त्याला अपवाद नाही. त्याने बाहुबली स्टार प्रभासबरोबर मिळून या अखेरच्या दृश्‍याला पुनः अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे.
“बाहुबली, द कन्लुजन’ च्या प्रचंड यशानंतर प्रभास अमेरिकेमध्ये सुटीसाठी निघून गेला. त्याने तिथे आरामही केला आणि नव्या दमाने कामासाठी तो पुन्हा भारतात आला आहे. आल्यावर त्याने वरुण धवनची भेट घेतली. त्यावेळी वरुणने या अखेरच्या दृश्‍याचा विषय काढला आणि दोघांनी मिळून या दृश्‍याचा पुनःप्रत्ययाचा अनुभव घेतला. कटप्पाने ज्याप्रमाणे बाहुबलीच्या पाठित तलवार खुपसली होती, तशाच प्रकारे वरुण धवननेही प्रभासच्या पाठीत तलवार खुपसण्याचे नाटक केले. या अनुभवाचे वर्णन वरुण धवनने सोशल मिडीयावर केले आहे. “प्रभास खरोखर डाऊन टू अर्थ कलाकार आहे. तो खूप स्ट्रॉंगही आहे. पण माझ्या हातात त्याची तलवार होती.’ असे वरुण धवनने म्हटले आहे.
वरुण धवनच्या घरीच हे नाटक रंगवले गेले. यावेळी राणा दुग्गबती आणि करण जोहरच्या मित्रांपैकी अलिया भट, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि पुनीत मल्होत्रा आदी उपस्थित होते. “बाहुबली 2’ने जगभर 2.000 कोटी रुपयांचा विक्रमी धंदा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)