कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न 

नवी दिल्ली: कच्च्या तेलाची आयात घटवित आयात खर्चात कपात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेलसाठी पर्याय म्हणून जैविक इंधनाचा वापर वाढविण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱया पिढीतील इथेनॉल, बायोडिझेल आणि बायोसीएनजी यांचा वापर वाढविण्यात येणार आहे. यामुळे आयात खर्चात कमी होण्यास, पर्यावरणपूरक आणि शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले.

देशातील तेल आणि वायू प्रकल्पातून उत्पादन वाढ, बायोफ्युएल इंधनासाठी निधी, अन्य पर्यायी इंधनाचा आणि तेलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात येणार आहे, असे प्रधान यांनी सांगितले. सरकारकडून नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्यूएल्स 2018 आणण्यात आली असून नाश झालेल्या धान्याचा वापर इथेनॉलच्या निर्मितीसाठी करत ते पेट्रोलमध्ये मिसळण्यात येईल. याव्यतिरिक्त अतिरिक्त धान्य उत्पादनाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात येईल असे त्यांनी म्हटले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)