कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन !

पिंपळे-सौदागर – येथील कुणाल आयकॉन सोसायटीतील प्रकल्पात ओला व सुका कचऱ्यापासून मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. चार ते पाच हजार सोसायटीची लोकसंख्या आहे. या उपक्रमाचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

आरोग्य विभागाचे अधिकारी प्रभाकर तावरे, सोसायटीचे विनोद सुर्वे, चंद्रशेखर सोनपोठकर, मकरंद गुर्जर, प्रविण ढमाले, नटराज श्रीनिवासन, जॉन डिसुझा व सोसायटीतील रहिवाशी यावेळी उपस्थित होते.
जागेवरच ओला व सुका कचऱ्याचे अलगीकरण करून सोसायटीतील प्लांटमध्ये संकलीत करण्यात येतो. सुरुवातीला

सोसायटीच्या एका व आता दोन भागांत काम सुरू करण्यात आले आहे. एक टन ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून येथे खत निर्मिती करण्यात येते. सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित कचरा प्लांटपर्यंत पोहचवण्यासाठी जागोजागी कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. सोसायटी परिसर व उद्यानातील पाला-पाचोळा, घरातील कचरा एका ठिकाणी संकलीत केला जातो. या खत निर्मिती प्रकल्पाची आयआयटी संस्थेनेही दखल घेतली आहे. तीन महिन्यात संकलित कचऱ्याची पहिली खेप (बॅच) निघणार आहे. सुरुवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुल झाडे, उद्यानातील झाडांना उपयोग करण्यात येणार आहे. अधिक झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीने सांगीतले.

कचऱ्यापासून खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबवल्यास कचरा बाहेर येणार नाही. खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहून वाटते. माझ्या प्रभागातील सोसायटींसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक

सोसायटीने कचऱ्याचे संकलन करून खत निर्मिती प्रकल्प उभारावा, ही संकल्पना मांडली असता सर्वांनी यात सहभागी होऊन योगदान दिल्याने प्रकल्प उभा राहिला.

-विनोद सुर्वे, चेअरमन, कुणाल आयकॉन सोसायटी

कचऱ्यापासून खत निर्मिती ही संकल्पना सर्वांनी अंगीकारल्यास खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल.

-मकरंद गुर्जर, सोसायटी सदस्य


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)