कचऱ्याच्या ढिगांवर “आप’चे पोस्टर्स

हा कचरा कोण उचलणार? : महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

पिंपरी – आम आदमी पक्षाकडून कचरा प्रश्‍नावर अनोखे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत भोसरी परिसरात आपने शहरातील कचऱ्याचे ढिग साचलेल्या 50 ठिकाणी प्रश्‍नांचे पोस्टर्स लावले.

शहरात सर्वत्र साथीचे आजार वाढले आहेत. एमआयडीसी भागात हा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सरकार स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करत आहे. मात्र, शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचराकुंड्या बऱ्याच ठिकाणी नाहीत. राडारोडा उचलण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे भटके कुत्रे, उंदीर, घुस यांची समस्या वाढली आहे.

या पार्श्‍वभूमीवर “हेच का स्वच्छ भारत अभियान’, “हा कचरा कोण उचलणार’, “इथे कचराकुंडी कोण ठेवणार?’ असे प्रश्‍न असलेले फलक “आप’ने कचऱ्याच्या ढिगांच्या ठिकाणी लावले आहेत. जोपर्यंत कचऱ्याचे ढिग उचलले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे “आप’ने म्हटले आहे. या आंदोलनात कपिल मोरे, वहाब शेख, राघवेंद्र राव, अनुप शहा, बसवराज कांजे आदींनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)