कचऱ्याच्या ठिकाणी फुलणार बाग ( भाग – 4 )

घनकचरा व्यवस्थापन
सुनिता शिंदे

कराड – स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करताना कराड नगरपालिकेने नवनवीन उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबवित असताना खतनिर्मिती करत स्वत:चा हरितब्रॅंन्ड बनविला आहे. याच खताचा वापर करुन सध्या कचऱ्याचा डेपो असणाऱ्या बारा डबरी परिसरात पालिकेच्या वतीने बाग फुलविण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याच्या पालिकेचा मानस असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु करण्यात आले आहेत.

-Ads-

कराड शहरातून जेवढ्या प्रमाणात कचरा दररोज घेतला जातो. त्याचे ओला व सुका असे विलगीकरण करुन त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र हा कचरा डेपोवर पुन्हा एकत्रित केला जातो. त्याऐवजी आता कचरा डेपो पूर्णपणे नष्ट होवून त्याठिकाणी सुशोभित वृक्ष असणारी बाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 5 कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

बाराडबरी परिसरात सध्या कराडचा कचरा एकत्रित केला जातो व त्यावर प्रक्रिया केली जाते. सध्या याच ठिकाणी कचऱ्यावर वीजनिर्मिती व खतनिर्मिती केली जाते. हा कचरा डेपो पूर्णपणे बंदिस्त केला जाणार आहे. यासाठी शेड बांधण्याचे काम सध्या सुरु आहे. 20 हजार स्क्‍वे. फूट जागेमध्ये प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम सुरु आहे.

कचऱ्यावर बायोमायनिंग (जुन्या व नव्या कचऱ्यावर आधुनिक व शास्त्रीय पध्दतीने विघटन करणे) करण्यात येणार आहे. या मशिनसाठी घनकचरा व्यवस्थापन निधीतून 1 कोटी 43 लाख रुपये निधी मिळालेला आहे. तर 14 व्या वित्त आयोगातून शेड बांधण्यासाठी 1 कोटी 87 लाख रुपये, भिंतीच्या कंपाऊंडसाठी 1 कोटी 70 लाख रुपये, वे- ब्रिजसाठी 15 लाख रुपये निधी मिळाला आहे. याचे पुर्णपणे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. अंतर्गत कॉंक्रीटीकरणाचे रस्ते तयार करुन याठिकाणी वड, पिंपळ तसेच शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत.

बारा डबरीमध्ये असणाऱ्या ऑक्‍सिडेशन पॉंण्ड शेजारी हा प्रकल्प होणार आहे. एका महिन्यात शहरातील कचरा डेपो पूर्णत: नष्ट होणार आहे. सध्या शेडचे काम सुरु असून दोन महिन्यात या सुशोभित कचरा डेपोचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरात कोठेही कचरा व डेपो राहणार नाही. येथे करण्यात येत असलेल्या विशिष्ट अशा बागेमुळे शहराचे सौंदर्य आणखीनच खुलण्यास मदत होणार आहे.

अशा प्रकारे पालिकेने घनकचऱ्यावर मात करीत नवनवीन उपक्रम राबवित इतर नगरपालिकांसमोर आदर्श घालून दिला आहे. पालिकेच्या या उपक्रमाची शासनालाही नोंद घ्यावी लागत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या स्पर्धेत पालिका अव्वल ठरणार यात काही शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)