कचरा वेचक महिलेला आढळली 43 काडतुसे

पिंपरी – पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही एका कचरा वेचक महिलेला 43 जिवंत काडतुसे सापडली आहेत. पोलिसांनी सर्व काडतुसे जप्त केली असून या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री उशिरा समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमला रघुनाथ कांबळे (वय-58) या चिंचवडच्या एम्पायर इस्टेट जवळील रेल्वे लाईनच्या कडेला कचरा गोळा करत होत्या. त्यावेळी त्यांना लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल 43 जिवंत काडतुसे सापडली. त्यामुळे घाबरलेल्या कमला बाईंनी ओळखीच्या एका माणसासह थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी येऊन भेट दिली.

-Ads-

पिशवीमध्ये एकुण 303 चे 26 जिवंत काडतूस आढळले. त्यावर इंग्रजीमध्ये के. एफ. 99 असे लिहिलेले आहे. तर 10 नग सिल्व्हर रंगाचे बाराबोर 2.2 सापडले. त्यावर इंग्रजीमध्ये मेड इन बेल्जीअम-12 असे लिहिलेले आहे. 7 नग लाल रंगाचे बाराबोर सापडले. त्यावर इंग्रजीमध्ये वेस्टर्न सुपर नंबर 12 मेड इन युएसए असे लिहिलेले आहे. पोलिसांनी ही काडतूस जप्त केली आहेत. ही काडतुसे कोण व का टाकली याचा अद्याप उलगडा झालेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)