कचरा वेचकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटला

जळोची- कचऱ्याच्या विळख्यात सतत दहा ते बारा तास राहिल्याने नगरपालिकेचे कचरावेचक आणि वाहनचालक कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले होते. कचरावेचक आणि वाहनचालक कर्मचारी कचरा डेपोमध्ये गेली 40 वर्षांपासून पिण्यासाठी पाणी, आरोग्य तपासणीच्या प्रतीक्षेत होते. मात्र नियोजन समितीच्या नियोजनामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अखेर त्यांना करण्यात आली.
शहराच्या घनकचरा व्यवस्थापनात कचरावेचकांचा सिहाचा वाटा आहे. सध्या 35 महिला व 10 पुरुष असे एकूण 45 नागरिक कचरावेचक आहेत. नगरपालिकेने सर्वांना ओळखपत्रे दिलेली आहेत. कचरा डेपोतील काम करणारे कर्मचारी, चालक याची महिन्याला आरोग्य तपासणी करण्यासाठी बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाला पत्र दिले आहे. आतापर्यंत तीन वेळा आरोग्य तपासणी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ज्या कचरावेचकांना उपचाराची व औषधांची गरज होती त्याच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती कचरा वेचक महिला लैलाबाई लांडगे यांनी सांगितली.
कचरा वेचताना डोळ्यांची जळजळ, डोळे सुजणे, कंबरदुखी, हाडांचा त्रास, धुळीची ऍलर्जी, त्वचाविकार, स्नायूंवरील ताण, दमा व श्‍वसनाचे आजार होऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेत 45 कचरा वेचकांना नगरपालिका प्रशासनाने सुरक्षित सामुग्री पुरवठा केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवण्यात आली असल्याने कचरा वेचकांनी समाधान व्यक्त केले आहे. कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या कचरा वेचकांना शासनाच्या योजनाचा लाभ मिळून देण्यासाठी व त्याचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन नियोजन समितीचे अध्यक्ष बिरजू मांढरे यांनी माहिती दिली.

  • 45 टन कचऱ्याची विल्हेवाट
    शहरातून दररोज 28 टन कचरा गोळा केला जातो. यामध्ये कचरा वेचक वर्गीकरणामध्ये एक ते दीड टन घेऊन जात असल्याने कचरा डेपोवरील महिन्याला 45 टन कचरा विल्हेवाट लागत असल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
  • कचरा वेचकांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ठेका सफाई कामगार व कचरावेचक, वाहनचालक, कायम असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची यापुढेही आरोग्य तपासणी करण्यात येईल. यांची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी करण्यात येईल.
    – योगेश कडूसकर मुख्याधिकारी बारामती नगरपालिका.
  • बारामतीमधील एकही घटक नागरी सुविधापासून वंचित राहू नये, त्यासाठी प्रशासन व सर्व नगरसेवक प्रयत्न करीत असतात. कचरा वेचकांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिन्याला आरोग्य तपासणी होत आहे.
    – बिरजू मांढरे, उपनगराध्यक्ष, बारामती नगरपालिका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)