कचरा प्रकल्पात महिलेचा विनयभंग

वाघोलीत प्रकल्प ठेकेदार अटकेत

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील वाघोली ग्रामपंचायतीच्या नियोजित कचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून प्रकल्पावर कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना घडली. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रकल्प ठेकेदार मनोहर दाभाडे (रा. इंझोरी, जि. वाशीम, सध्या, रा. गोकुळनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठेकेदारास अटक करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही प्रकल्पात काम करत होती. मशीनवर काम करण्यासाठी कपड्यावरुन शर्ट घातले असताना ठेकेदार दाभाडे यांने फिर्यादी जवळ जाऊन, तुझ्या शर्टचे दोन बटन उघडे ठेव, असे बोलून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर फिर्यादी घरी निघून गेली. फिर्यादीच्या घरी जाऊन हा विषय इथेच संपून टाक. नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो, अशी दमदाटी केली. काम करत असताना कामाच्या बाहण्याने अंगाला स्पर्श करून फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. एस. गिलबिले करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)