कचरा प्रकल्पग्रस्त वारसांच्या नोकरीसाठी स्वतंत्र कक्ष

पुणे – उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोसाठी जागा संपादित करण्यात आलेल्यांच्या वारसांच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर यासाठी एका अधीक्षकाची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुुमारे 57 वारसांना राज्यशासनाने प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देत महापालिकेत घेण्याच्या प्रस्तावास राज्यशासनाने मंजुरी देऊनही अजून हा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे या दोन्ही गावांमधील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच; खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या कक्षाची स्थापना करत जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

महापालिकेच्या सुमारे 163 एकर जागेवर असलेल्या या कचरा प्रकल्पासाठी 1993 मध्ये मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले होते. त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत कायम करून घेण्याची या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांनाही आंदोलनेही केली होती. अखेर मागील वर्षी राज्यशासनाने या गावांमधील 57 वारसांना महापालिकेत नोकरी देण्यासाठी मंजुरी दिली होती.

मात्र, त्याला 6 महिने झाले, तरी अजूनही या नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झालेला नाही. त्यामुळे हे वारस अजूनही महापालिकेत एकवट मानधनावरच कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी या गावांच्या समस्यांच्या पाश्‍वर्भूमीवर महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन पाळले नसल्याचे सांगत, ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पालिकेने हे पाऊल उचलले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)