कचरा निविदेतील ठेकेदार न्यायालयात

पिंपरी – महापालिकेने शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी दोनच ठेकेदारांना कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय घेतला. परंतु, आरोपांच्या खैरातीमुळे वादग्रस्त ठरलेली ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्यात आली. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या निवेदेशी संबधित ए. जी. एन्व्हायरो या ठेकेदाराने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या निविदेप्रक्रियेला लागलेले वादाचे ग्रहण कायम आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया आणखी लांबणार आहे.

पहिल्या निविदेमध्ये शहराच्या एका भागासाठी बीव्हीजी कंपनी व दुसऱ्या भागासाठी मे. ए.जी. इनव्हायरो इंफ्रा. कंपनीस काम मिळालेले आहे. या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने स्थायी समितीने हे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला. नंतर प्रशासनाने फेरनिविदा काढल्यानंतर पुन्हा दर कमी केल्याने स्थायीने त्या दोन ठेकेदारांना काम देण्याचा निर्णय घेतला.

-Ads-

दरम्यान, प्रशासन फेरनिविदेवर राबविण्यावर ठाम राहिल्याने ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही निविदा चार भागात काढली असून एकूण सुमारे 45 कोटी खर्चाचे हे काम आहे. आधीच्या निविदेत पात्र ठरलेल्या ठेकेदारांपैकी बीव्हीजीने पुन्हा निविदा भरली. परंतु, ए. जी. इनव्हायरो या फेरनिविदेत सहभाग घेतला नाही. त्यानंतर ए. जी. एनव्हायरो कंपनीकडून सोमवारी (दि.3) उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी फेरनिविदेवर आक्षेप घेतल्याची माहिती आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

आरोपांमुळे कामाला विलंब
कचरा निविदा प्रक्रियेचे चुकीचे नियोजन आरोप आणि वादामुळे यापूर्वीच या कामाला विलंब झाला आहे. त्यात ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने या निविदेला पुन्हा आडकाठी येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काल याचिका दाखल होताच महापालिका आरोग्य विभागाने याचिकेची माहिती घेतली. त्यावर मंथन सुरू झाले असून प्रशासाने महापालिका विकलांना याचिकेची माहिती अभ्यासासाठी पाठविली असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)