कचरा डेपोला आग

File photo

कोथरूड – कोथरूड येथील कचरा डेपोत संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या दोन तासाच्या अथक परिश्रमाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दीपावली सण साजरा करत असताना लोकमान्य वसाहतीतील लहान मुलांच्या फटक्‍याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या साह्याने आग आटोक्‍यात आणली. संध्याकाळची वेळ आणि बघ्यांची गर्दी लोटली होती, त्यामुळे आग विझविण्यासाठी अडथळे निर्माण झाले.

या भागात अशा घटना वारंवार घडत असतात, तरीसुद्धा पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही. आग लागली तेथे जवळच लोकमान्य वसाहत आहे. त्यामुळे या आगीचे स्वरूप आणखी मोठे झाले असते, याचा मोठा धोका वसाहतीतील लोकांना झाला असता.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने याठिकाणी झाडांचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला आहे. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला असे सांगण्यात आले आहे.

कचरा डेपो शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीमधील मुले संध्याकाळच्या वेळेत फटाके फोडत असल्या कारणाने आग लागल्याचा अंदाज आहे. तसेच उद्यान विभागाने याठिकाणी झाडांचा पालापाचोळा आणि कचरा मोठ्या प्रमाणात टाकला आहे, त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला असावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)