कचरा टाकू नका, फलक लावले पण शंभर रुपये दंडाचे झाले काय..

साताऱ्याची तऱ्हा

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)-
आपल्या घरातील कचरा शेजारच्यांच्या अंगणात टाकण्याची परंपरा आजही जपणाऱ्या सातारा शहरातील नागरिकांची तऱ्हा काय सांगावी. कचरा पहिल्यांदा डोक्‍यात तयार होतो नंतर तो रस्त्यांवर येतो. सातारा नगर पालिकेच्या वतीने सातारा शहर कुंडीमुक्त करण्याचा निर्धार केला पण त्याला नागरिकांनी सहकार्य करण्याचे सोडून रस्त्यावरच कचरा टाकण्यास सुरुवात केली. घरापर्यंत घंटा गाड्या येतात. परंतु त्यामध्ये कोणी कचरा वेग वेगळा करून टाकत नाही. स्वच्छ सर्वेक्षणा पुरते कामकाज अगदी दिखाऊ झाले. शहरातील मुताऱ्या स्वच्छ झाल्या. ऍपवर फोट काढून पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. सातारकरांनी धडाक्‍यात फोटो पाठवले पण त्यात पालिकेने प्रत्यक्ष कारवाई किती केली हे त्यांनाच माहिती. भिंती रंगवल्या गेल्या. अजून ही या भिंतींवर सुद्धा स्वच्छ सातारा, सुंदर सातारा हा संदेश तसाच आहे. सताराकरांची तऱ्हा न्यारी त्यांना याचे काही सोयर , सुतक नाही. कचरा कुंड्या हलल्या मात्र कचरा तिथेच पडतोय. अश्‍या ठिकाणी नगरपरिषदेने मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या नावाने आदेशांचे फलक लावले आहेत. त्यावर, या ठिकाणी कचरा कुंडी काढली आहे. या ठिकाणी जे कोणी कचरा टाकतील; त्याना प्रत्येक वेळी 100 रुपये दंड करण्यात येईल,अशा आशयाचा तपशील आहे. पण सातारकरांची मानसिकता अजून तरी कायम आहे. तर पालिका प्रशासन व आरोग्य विभाग स्वच्छते बाबत अपयशी ठरले आहेत. चुकीचे वागणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे घोडे अडते या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. शहरामध्ये ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या व परिसरामध्ये पसरत असलेली दुर्गधीमुळे नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्न गंभीर झाला असताना, सातारकर त्याजागेवरतीच कचरा टाकत आहेत. अगोदर किमान कुंडीत तरी कचरा पडायचा आता तर तो रसत्यावरती इतरत्र पडत आहे. आणि तो देखील फलकासमोरच आता या सातारच्या नागरिकांची तऱ्हा काय सांगावी..


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)