कचरा टाकणारेही आता रडारवर

हद्दीलगतच्या गावकऱ्यांकडून भल्या पहाटे दंड वसुली

पुणे – थुंकीबहद्दरांनंतर आता रस्त्यांवर कचरा टाकणारे आणि लघुशंका करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईला सुरूवात केली. त्यामध्ये गावांमधून शहराच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. थुंकणाऱ्यांवर कारवाईला महापालिकेने सुरूवात केली आहेच, परंतु आता सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर कचरा टाकणारे, लघुशंका करणारे यांच्यावर कारवाईला शुक्रवारी सकाळपासून सुरूवात करण्यात आली.

लगतच्या गावांमधून पहाटेच्या सुमाराला महापालिका हद्दीमध्ये कचरा आणून टाकला जातो. त्याबाबत अनेकदा गावांना सूचना देण्यात आल्या. याशिवाय दंडही आकारण्यात आला. मात्र, या गावांनी काहीच सुधारणा केली नाही. यावर महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी कारवाईला सुरूवात केली आहे.

1. खांदवेनगर येथे महापालिका हद्दीमध्ये कचरा टाकताना शुक्रवारी सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा कचरा वाघोली ग्रामपंचायत हद्दीतून महापालिका हद्दीमध्ये येत होता. ग्रामपंचायतीतील कामगार आणि ग्रामपंचायत सदस्यही यावेळी उपस्थित होते.

2. येरवडा, कळस- धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग एकमध्ये धानोरी खदान येथे कचरा टाकणारे, लघुशंका करणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर शुक्रवारी रात्री नऊ ते एकपर्यंत कारवाई करण्यात आली. डीएसआय संजय घावटे एस. आय. अमोल म्हस्के, सेवक संदीप खुंठे यांनी 15 जणांवर कारवाई करून 2,870 रुपये दंड वसूल करण्यात आला.

3. कात्रज भाजी मंडई येथेही रात्री उशिरापर्यंत थांबून रस्त्यावर कचरा न टाकण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांनी नागरिकांना केल्या. तसेच त्यांचे नाव, पत्ते घेण्यात आले. तसेच न ऐकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कात्रज येथीलच क्रोनिक स्पॉट जुना पीएमपी डेपो येथे रात्री कचरा रस्त्यावर न टाकता घरी येणाऱ्या कचरावेचकांना कचरा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रभाग क्रमांक 32 मधील समाविष्ट गाव शिवणे येथे देशमुखवाडी क्रॉनिक्‍स स्पॉट बंद करण्याचे नियोजन करण्यात आले असून, दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे विभागाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)